“आता भावी मुख्यमंत्री नाही, तर पंतप्रधान व्हा” आयोजकांनी म्हणताच देवेंद्र फडणवीस यांनी…. | पुढारी

“आता भावी मुख्यमंत्री नाही, तर पंतप्रधान व्हा” आयोजकांनी म्हणताच देवेंद्र फडणवीस यांनी....

पुढारी ऑनलाईन: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्रातला एक सक्षम नेता म्हणून पाहिलं जातं. बुधवार २१ जून रोजी देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती. खरं तर देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर मुख्यमंत्री होतील असं सर्वांना वाटलं होतं. मात्र, ते उपमुख्यमंत्री झाले. आजही त्यांनी मुख्यमंत्री व्हावं असं अनेक लोकांना वाटतं. फडणवीस हे केंद्रातही उत्तम काम करु शकतील असा विश्वासही पक्षातील त्यांच्या समर्थकांना वाटतो. पुण्यातल्या कार्यक्रमात तुम्ही भावी मुख्यमंत्री नाही, तुम्ही आता भावी पंतप्रधान व्हायला हवं असं आयोजक म्हणाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक कृती केली आहे.

बुधवार २१ जून रोजी पुण्यात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेच्या नव्या इमारतीचा शुभारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मॉडर्नस कॉलेजच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आले. हा सोहळा शिवाजीनगर येथे पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजक बोलत होते, तेव्हा ते म्हणाले देवेंद्रजी आता भावी मुख्यमंत्री नको, भावी पाच आकडी शब्द! भावी पंतप्रधान असं आयोजक गजानन एकबोटे म्हणाले. त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मान डोलवली आणि हात जोडले. यानंतर तुम्ही नाहीच म्हणाल. मात्र, टाळ्याच तुम्हाला किती वाजत आहेत, ते कळतंय असंही एकबोटे यांनी फडणवीसांना उद्देशून म्हटलं. त्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा हात जोडले. पुण्यात या प्रसंगाची जोरदार चर्चा रंगली आहे.

हेही वाचा:

यंदाच्या गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट साकारणार अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती

आषाढी वारीसाठी उजनीतून भीमा नदीत सोडले पाणी

पुणे: चोरलेल्या २१ मोटार सायकलींसह तिघे जेरबंद अटक, इंदापूर पोलिस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कामगिरी

 

Back to top button