आषाढी वारीसाठी उजनीतून भीमा नदीत सोडले पाणी | पुढारी

आषाढी वारीसाठी उजनीतून भीमा नदीत सोडले पाणी

इंदापूर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या आषाढी वारीचा सोहळा २९ जून रोजी होणार असून त्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत बुधवार २१ जून रोजी सकाळी ९ वाजता पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. दोन गाळ मोरीतुन 1500 क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली असुन दुपारी दीड वाजता तो ३००० क्युसेक एवढा केला आहे. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने सायंकाळपर्यंत वाढ केली जाणार आहे.

२४ जुनला पाणी पंढरपूर येथे पोहचेल असे नियोजन करण्यात आले आहे. ते पाणी २९ जून रोजी बंद करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिलेली आहे.

सध्या उजनी धरणात एकुण ४७ .८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून त्याची टक्केवारी मायनस, (उणे) -२९ .६१ (-१५ . ८६ टीमसी ) अशी आहे. धरणातील पाणी पातळी ४८८. ४७० मीटर असून धरणातून कालवा बोगदा नदी, सीना माढा दहिगाव सिंचन योजना या सर्व ठिकाणी पाण्याचा विसर्ग शेतीसाठी बंद पडलेला आहे.

हेही वाचा:

कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात २३ जून रोजी पाऊस, मुंबई- नागपूर हवामान केंद्राचा अंदाज

पुणे: चोरलेल्या २१ मोटार सायकलींसह तिघे जेरबंद अटक, इंदापूर पोलिस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कामगिरी

पुणे : दौंड तालुक्याच्या विद्यार्थी, रुग्णांचे भविष्य टांगणीला

 

Back to top button