पाकिस्तानी नागरिक झाले पुणेकर ! 264 जणांना भारतीय नागरिकत्व | पुढारी

पाकिस्तानी नागरिक झाले पुणेकर ! 264 जणांना भारतीय नागरिकत्व

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू नागरिकांना भारतीय नागरिकत्व दिले जात आहे. त्यात मूळ पाकिस्तानातील सिंध प्रांतातील असलेल्या; परंतु आठ वर्षांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या 264 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. केंद्र सरकारतर्फे पुणे जिल्हा प्रशासनाला 2018 मध्ये नागरिकत्व देण्याचे अधिकार देण्यात आले. पुणे शहरासह, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि विभागातील, जवळच्या जिल्ह्यातील 312 सिंधी बांधवांनी भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवलेे.

त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सर्व प्रक्रिया जाणून घेत, भारतीय दूतावास आणि इतर प्रशासकीय यंत्रणांशी समन्वय साधून नागरिकत्व देण्याची कार्यवाही सुरू केली होती. 28 सिंधी बांधवांच्या प्रस्तावावर प्रक्रिया सुरू असून, लवकरच त्यांना देशाचे नागरिकत्व देण्यात येणार असल्याची माहिती गृह शाखेचे तहसीलदार धनंजय जाधव यांनी दिली. 19 प्रस्ताव असे आहेत, ज्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी, अपूर्ण असल्याने ते निकाली काढण्यात आले असून, 28 प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे. तर आतापर्यंत 264 जणांना नागरिकत्व देण्यात आलेढ, असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

हे ही वाचा : 

रत्नागिरी : वाशिष्ठी डोहात बुडून दोघांचा मृत्यू

पुणे : यवत येथे अपघातात दोन ठार; पादचारी आडवा आल्याने झाला अपघात

Back to top button