

यवत :पुढारी वृत्तसेवा : यवत(ता.दौंड) येथे झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि.२०) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर यवत ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील बाजूस पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने दुचाकी वरून चाललेले केडगाव येथील युवक प्रज्ज्वल संतोष शेळके (वय 25) व विवेक बारवकर (वय 23) यांच्या दुचाकीला एक अज्ञात व्यक्ती आडवा आल्याने अपघात झाला होता.
या अपघातात दुचाकीची धडक बसून त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी वरील प्रज्ज्वल शेळके हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी त्वरित लोणी काळभोर मधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शेळके याला मृत घोषित केले. या घटनेचा अधिक तपास यवत पोलीस करत आहेत. प्रज्ज्वल शेळके हा दौंड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष संतोष शेळके यांचा मुलगा आहे.
हे ही वाचा :