पुणे शहरात हलक्या पावसाचा अंदाज | पुढारी

पुणे शहरात हलक्या पावसाचा अंदाज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात पावसाला सुरुवात होत असून, 20 ते 25 जून या कालावधीत हलका ते मध्यम पाऊस होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. शहराचे कमाल तापमान कमी झाले असून, पहाटे गार वारा वाहत आहे. मात्र, ढगांच्या गर्दीमुळे दिवसभर उकाडा जाणवत आहे. या उकाड्यापासून लवकरच सुटका होणार असून, 20 ते 25 जून या कालावधीत सायंकाळी हलका पाऊस होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला. आगामी पाचही दिवस आकाश ढगाळ राहून हलका पाऊस पडेल. 24 व 25 जून रोजी पावसाचा किंचित जोर वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

सतर्कतेचा इशारा

पुणे वेधशाळेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसात विजांचा कडकडाट होत असेल, तर झाडाखाली उभे राहू नका, मोबाईलसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळू नका. कडक ऊन असेल तर सुती कपडे घाला, चेहरा सुती कापडाने झाकून घ्या, सतत पाणी प्या म्हणजे उष्माघाताचा धोका होणार नाही.

हेही वाचा

पुणे : ना फायर ऑडिट, ना इन्शुरन्स ! दै. पुढारी’ने गोदामांबाबत केलेल्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर

पुणे : तीन कनिष्ठ अभियंते पालिका सेवेतून बडतर्फ

Moonson : जूनच्या सरासरीत महाराष्ट्रात यंदा नीचांकी पाऊस; पेरण्या खोळंबल्या

Back to top button