मोशी : बोर्‍हाडेवाडीची नवी शाळा सोमवारपासून गजबजणार | पुढारी

मोशी : बोर्‍हाडेवाडीची नवी शाळा सोमवारपासून गजबजणार

मोशी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या धोकादायक शाळेत शिक्षण घेणार्‍या चिमुकल्यांना येत्या सोमवारपासून दिलासा मिळणार असून, सद्या तात्पुरत्या पत्राशेडमध्ये शिक्षण घेणार्‍या चिमुकल्यांचे सोमवारपासून शाळेच्या नव्या इमारतीत वर्ग भरणार आहेत. अनेक वर्षांनी प्रतीक्षा संपली असून सोमवारपासून या शाळेतील वर्गखोल्यात मुलांचा किलबिलाट होणार आहे.

बोर्‍हाडेवाडी येथील कै.महादू श्रीपती सस्ते मुले – मुलींची शाळा क्रमांक तेरा या पालिका शाळेचे काम पूर्ण होऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन देखील झाले आहे.नवे शैक्षणिक वर्षे सुरू झाले असल्याने सोमवारपासून नव्या इमारतीत शाळा भरणार आहे. यात प्रशस्त वर्गखोल्या, मुख्याध्यापक, शिक्षक कक्ष, प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृह, सभागृह, प्रयोगशाळा, वाचनालय, भांडारगृह, प्रशस्त पार्किंग व खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध आहे.

1बोर्‍हाडेवाडीतील शाळेत वाडी व वस्त्यांवरील, संजय गांधी नगरमधील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इथे पहिली ते आठवीपर्यंतच वर्ग असल्याने नागरिकांना आपल्या मुलांच्या पुढील शिक्षणासाठी खासगी शाळेत टाकावे लागत होते. खासगी शाळा व त्याच्या अवाजवी खर्च हा या कुटूंबाना न पेलवणारा होता. यामुळे गेले अनेक वर्षांपासून येथील पालिकेच्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाण्याची मागणी देखील पूर्ण झाली आहे.

2पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण एकाच छताखाली होणार असल्याने नागरिकदेखील काळीजी मुक्त झाले आहे. पालिकेच्या शाळेची यामुळे गुणवत्ता व पटसंख्या वाढ देखील होणार आहे. एकंदरीतच बोर्‍हाडेवाडीतील शाळा आगामी काळात नव्या इमारतीत आणि नवीन वाढीव वर्गासह सुरू होत असल्याने पालिका शाळेत विद्यार्थ्यांची होणारी गळती थांबण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा

पुणे : श्रीक्षेत्र वीर येथे शनी अमावास्येनिमित्त भक्तांची गर्दी

वडगाव मावळ : खंडणी मागणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : इंदापुरात रानगव्याचा परत जनावरांवर हल्ला

Back to top button