आज पुण्यात ‘शासन आपल्या दारी’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत कार्यक्रम | पुढारी

आज पुण्यात ‘शासन आपल्या दारी’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत कार्यक्रम

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत थेरगाव येथील पद्मजी पेपर मिलजवळ शासन व महापालिकेच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांना विविध दाखले व लाभाचे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.16) दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे.

महापालिकेने निगडी येथे उभारलेल्या महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता होईल, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप तसेच, विविध दाखल्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

तेथील विविध स्टॉल्समध्ये उत्पन्नाचा दाखला, नवीन मतदार नोंदणी, रहिवासी दाखला, सातबारा, वय, अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला, आधार कार्डमधील नवीन दुरुस्ती व अद्ययावत करणे, असे विविध दाखले दिले जाणार आहे. पालिकेच्या समाज विकास विभागाच्या कल्याणकारी योजनेतील लाभार्थ्यांना लाभांचे वितरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. घरकुल योजनेतील सहा इमारतींमधील 252 सदनिकांचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात येणार.

हेही वाचा

कुपवाडात मोठी कारवाई; चकमकीत ५ परदेशी दहशतवादी ठार

अहमदनगर : लांबलेला पाऊस महापालिकेच्या पथ्यावर; नालेसफाई संथ गतीने

पुणे : ‘पिन’ मिळवत मोलकरणीने ज्येष्ठ महिलेच्या एटीएममधून काढले पाच लाख

Back to top button