पुणे : ‘पिन’ मिळवत मोलकरणीने ज्येष्ठ महिलेच्या एटीएममधून काढले पाच लाख | पुढारी

पुणे : ‘पिन’ मिळवत मोलकरणीने ज्येष्ठ महिलेच्या एटीएममधून काढले पाच लाख

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कॅनडा येथे जाताना आपल्या आईचा सांभाळ करण्यासाठी नेमण्यात आलेल्या मोलकरणीने 7 तोळे वजनाची सोनसाखळी लांबवत एटीएमचा ‘पिन’ मिळवून ज्येष्ठ महिलेच्या खात्यातून तब्बल 5 लाख 21 हजार रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी घरकाम करणार्‍या सोनाली शेखर पाटील (वय 33, रा. जायकवाडी पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सुजाता शंकर (56, रा. कुमार समृध्दी सोसायटी, टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल ते जून महिन्या दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुजाता यांना कॅनडा येथे जायचे असल्याने त्यांनी त्यांच्या आईचा सांभाळ करण्यासाठी मोलकरणीला नेमले होते. त्यावेळी मोलकरणीने वृध्द महिलेची सात तोळे वजनाची सोनसाखळी चोरी केली. नंतर त्यांच्या एटीएमचा ‘पिन’ व एटीएम कार्ड प्राप्त करून वेळोवेळी तिने 5 लाख 21 हजारांची रक्कम काढून फसवणूक केली. फिर्यादी भारतात परतल्यानंतर त्यांनी याबाबत फिर्याद दिली.

हे ही वाचा : 

Manipur : केंद्रीय मंत्री आरके रंजन यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्बचा हल्ला (व्हिडिओ)

कर्नाटकात धर्मांतरबंदी उठणारच; मंत्रिमंडळाचा निर्णय

Back to top button