‘जी-20’मध्ये भारतीय तंत्रज्ञानाचा डंका | पुढारी

‘जी-20’मध्ये भारतीय तंत्रज्ञानाचा डंका

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  भारताने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा अनेक अविकसित व विकसित देशांना लाभ होत आहे. त्यामुळेच जगभरातील देश भारताबरोबर अनेक करार करीत आहेत. विशेषत: आधार उपक्रमासोबत जोडून घेण्यास विविध देश इच्छुक असल्याचे अनेक प्रतिनिधींनी सांगितले. भारताच्या या डिजिटल तंत्रज्ञानाचा डंका वाजवत जी-20 परिषदेच्या थर्ड मीटिंग ऑफ डिजिटल इकॉनोमी वर्किंग ग्रुपच्या तिसर्‍या बैठकीचा समारोप पुण्यातील बुधवारी झाला.

भारतातील ‘डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर’, ‘डिजिटल स्किलिंग’ आणि ‘डिजिटल इकॉनॉमीमधील सायबर सुरक्षा’ याविषयी बैठकीत समाधान व्यक्त केले. 50 हून अधिक देशांच्या प्रतिनिधींनी प्रदर्शनातील तंत्रज्ञान व त्यासाठी लागणार्‍या सर्व सॉफ्टवेअरची माहिती घेतली. समिट दरम्यान भारताचे तंत्रज्ञान स्वीकारण्याबाबत चार देशांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. त्यामाध्यमातून लोकसंख्येच्या प्रमाणात लागू केलेले यशस्वी डिजिटल उपाय त्यांच्या देशात वापरणे सोपे जाणार आहे.

150 प्रतिनिधी अन् 50 देश
जी-20 परिषदेसाठी 50 देशातील सुमारे 150 विदेशी प्रतिनिधी आणि 250 हून अधिक प्रतिनिधींनी या शिखर परिषदेला वैयक्तिकरीत्या हजेरी लावली. याशिवाय, 2 हजारांहून अधिक नागरिकांनी समिटला थेट उपस्थिती नोंदवली.

10 पॅनल चर्चा
परिषदेच्या समिटदरम्यान आयोजित सेक्टर अज्ञेयवादी आणि सेक्टरल डीपीआयवर 10 पॅनल चर्चा करीत त्यासंबंधीचा डाटा गोळा करण्यात आला. 60 जागतिक तज्ज्ञांनी अंतर्ज्ञानी, विचार करायला लावणारी आणि परिणाम देणारी चर्चा करून त्यांच्या देशात सुरू असलेल्या प्रकल्पाची माहिती दिली.

हे ही वाचा :

पुणे : नळ योजनांची 155 कामे लटकली ; ‘जलजीवन’मध्ये ठेकेदारांना नोटिसा

पुणे : फुरसुंगी, उरुळी देवाचीबाबत हरकतींवरील सुनावणी पूर्ण

Back to top button