पुणे : अनाथ अल्पवयीन मुलीवर बलात्कार | पुढारी

पुणे : अनाथ अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मामाच्या घरी शिक्षणानिमित्त राहत असलेल्या अनाथ मुलीवर एका 51 वर्षीय प्रौढाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मामाचे घर उद्ध्वस्त करण्याची धमकी देत बळजबरीने मागील पाच वर्षांपासून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार गुन्हा दाखल झाल्यानंतर उघडकीस आला आहे.

रघुनाथ बोरकर असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सध्या 20 वर्षांच्या तरुणीने वारजे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बोरकरवर बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2018 ते जून 2023 यादरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगी ही मामाच्या घरी राहत असताना, रघुनाथ बोरकर याने सप्टेंबर 2018 ते जून 2023 यादरम्यान आरोपीने तिच्या मामाचे घरी तसेच गावातील डोंगरावर, वेताळ टेकडीवर, तसेच आरोपीचे चायनीज सेंटरवर व कर्वेनगर येथील एक खोलीवर मुलीस नेऊन तिच्या भावाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्या मामाचे घर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन, ती अनाथ असल्याचा फायदा घेऊन तिला वेगवेगळ्या गोष्टींचे आमिष दाखवून अत्याचार केले. याबाबत वारजे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस. जाधव पुढील तपास करत आहे.

हेही वाचा

पुणे : उपाहारगृहातील रोकड, साहित्य चोरणार्‍या कामगारांना अटक

पुणे : सिंहगड पोलिस ठाण्यातून बांगलादेशी चोरटे पसार

Back to top button