पुण्यात मार्केटयार्डमध्ये हॉटेलला भीषण आग; 2 कामगारांचा होरपळून मृत्यू | पुढारी

पुण्यात मार्केटयार्डमध्ये हॉटेलला भीषण आग; 2 कामगारांचा होरपळून मृत्यू

पुणे : पुण्यात मार्केटयार्ड येथील एका हॉटेलला मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत हॉटेलमधील तीन कामगार होरपळले असून यातील दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अन्य एकावर उपचार सुरू असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलिसांचे पथक पोहचले असून आगीवर नियंत्रण आणले आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, काल मध्यराञी एक वाजता मार्केटयार्ड, गेट नंबर एक येथील हॉटेल रेवळ सिद्धि या हॉटेलला आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले. दरम्यान, हे हॉटेल आतमधून बंद होते.

हॉटेलच्या आतमध्ये अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता, पोटमाळ्यावर झोपलेल्या तीन कामगारांना जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, यामधील दोन कामगारांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला तर, अन्य एकावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही.

हेही वाचा

दिल्ली वार्तापत्र : भाजपला रोखण्यासाठी विरोधकांचा चंग!

डॉ. अनिल रामोड प्रकरण : 2 हजारांच्या नोटाही जमा झाल्या सरकारी तिजोरीत!

सहा कोटी वर्षांपूर्वीच्या डायनोसोरचे जीवाश्म सापडले

Back to top button