पुणे डीआरडीओ हनीट्रॅप प्रकरण : कुरुलकरला आज पुन्हा न्यायालयात आणणार! | पुढारी

पुणे डीआरडीओ हनीट्रॅप प्रकरण : कुरुलकरला आज पुन्हा न्यायालयात आणणार!

पुणे : भारतीय संरक्षण विभागाची गोपनीय माहिती व कागदपत्र पाकिस्तानला देणार्‍या डीआरडीओचा शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोरेश्वर कुरुलकर याच्या कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाऊ शकते. तीन दिवसांपूर्वी तपास यंत्रणेच्या वतीने कोठडीची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो परत करून पुन्हा येण्याचे बजावले होते.

हनीट्रॅप जाळ्यात अडकलेल्या डीआरडीओ (संरक्षण संशोधन व विकास संस्था) शास्त्रज्ञ डॉ. कुरुलकर याने देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण होईल असे कृत्य केले होते. मिसाईल व रॉकेट लॉन्चरचे तंत्रज्ञान पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेस दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्याला 3 मे रोजी एटीएसने अटक केली होती.

सध्या कुरुलकर येरवडा कारागृहात असून, तपासात मदत करीत नसल्याचे तपास अधिकार्‍यांनी सांगितले होते. nजप्त केलेल्या मोबाईलचा पासवर्ड देत नसल्याने तो बेंगळुरू फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्याची विनंती न्यायालयात करण्यात आली होती. तोच अर्ज सोमवारी (दि.12) पुन्हा करून कोठडीत वाढ देण्याची विनंती केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा

पुणे : बहुजनांचा ब्रँड होईन : छत्रपती संभाजीराजे

नगर : नळपाणी योजनेच्या कामाला ब्रेक ; आनंदवाडी गावातील नागरिकांचा उपोषणाचा इशारा

Back to top button