नगर : पाथर्डीत 40 हजारांची घरफोडी | पुढारी

नगर : पाथर्डीत 40 हजारांची घरफोडी

पाथर्डी तालुका (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव रस्त्यावर खेर्डा फाटा येथील दादासाहेब बाळू ढोरमारे यांच्या घरी चोरटयांनी चोरी करून 20 हजार रुपयांसह पाच ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल फोन असा 40 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
ढोरमारे यांच्या कुटुंबातील काही सदस्य घराचा दरवाजा उघडा ठेवून, तर काही घरासमोर झोपले. त्यांनतर शनिवारी ( दि. 10) रात्री दादासाहेब ढोरमारे उठले असता, त्यांचा मोबाईल दिसला नाही.

तेव्हा पत्नी नेहा हिला उठवले असता, मोबाईलचा शोध घेता तो सापडला नाही. घरातील सामानाची उचकापाचक झालेली दिसली. तेव्हा सोन्या-चांदीचे दागिने कपाटात ठेवलेले होते. तेही लंपास करण्यात आले. चोरट्याने घरात प्रवेश करुन रोख 20 हजार रुपयांसह पाच ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल असा 40 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.

 

Back to top button