Ashadhi Wari 2023 : भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद ! उन्हातही वारकरी हरिनामात दंग | पुढारी

Ashadhi Wari 2023 : भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद ! उन्हातही वारकरी हरिनामात दंग

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : 

आता कोठे धावे मन। तुमचे चरण देखिलीया ॥ 1 ॥
भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद ॥ 2 ॥
प्रेमरसे बैसली मिठी । आवडी लाठी मुखाची ॥ 3 ॥
तुका म्हणे आम्हा जोगे। विठ्ठल घोगे खरे माप ॥ 4 ॥

कडक ऊन आणि पायाखाली तापती फरशी अशा वातावरणातदेखील टाळाचा गजर आणि मुखी ’ज्ञानोबा माउलीं’चे नाम क्षणभरदेखील न थांबवता भक्तिनामात दंग झालेल्या वारकर्‍यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा रंगून गेला. साधारण दुपारी दोनपासून सायंकाळी सातपर्यंत रंगलेल्या या सोहळ्यात वारकर्‍यांनी फेर धरत, फुगडी, मनोरे रचत वातावरणात जल्लोष भरला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, जिल्हा सत्र न्यायाधीश मच्छिंद्र चांडक, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पालखी सोहळाप्रमुख अ‍ॅड.विकास ढगे पाटील, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, विश्वस्त योगेश देसाई, अभय टिळक, सुधीर पिंपळे, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार,रामभाऊ चोपदार, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर माउलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास उपस्थित होते.

हेही वाचा

Ashadhi Wari 2023 : पालखी मार्गावर दुचाकी रुग्णवाहिकेसह आरोग्यदूत

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यांसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; महापालिकेचे दवाखाने तीन दिवस मोफत

Back to top button