मोठी बातमी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक | पुढारी

मोठी बातमी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाला पुण्यातून रविवारी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे (वय 34) असं पवारांना धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव आहे. या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपी सागर बर्वे हा आयटी इंजिनीअर आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं आहे. याप्रकरणी आरोपीला स्थानिक न्यायालयानं 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांना ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या फेसबुक पेजवरुन ‘तुमचा लवकरच दाभोलकर करू’ अशी धमकी देण्यात आली होती.

तर अमरावती येथील सौरभ पिंपळकर या भाजप कार्यकर्त्याच्या ट्विटवरून पवारांची औरंगजेबाशी तुलना करुन आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे त्याची तक्रार केली होती. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी तातडीने तपास सुरु केला होता. तांत्रिक तपास केल्यानंतर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाचे फेसबुक पेज पुण्यातील इंजिनिअर सागर बर्वे हा चालवत असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा

कोल्हापूर जिल्ह्यात आढळला ‘रॅमबुटान’ वृक्ष

वाल्हे : पालखी सोहळ्याचे यंदाही धोकादायक मार्गावरूनच प्रस्थान

वाल्हे : पालखी सोहळ्याचे यंदाही धोकादायक मार्गावरूनच प्रस्थान

Back to top button