आळंदीत प्रस्थान सोहळ्यादरम्यान वारकरी – पोलिसांमध्ये धुमश्चक्री | पुढारी

आळंदीत प्रस्थान सोहळ्यादरम्यान वारकरी - पोलिसांमध्ये धुमश्चक्री

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्या दरम्यान मंदिरातील गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी यंदा कडक बंदोबस्त आणि नियमावली केली असून पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जात नाहीये. मानाच्या दिंड्यामध्ये देखील मोजकेच ७५ वारकरी मोजून सोडले जात आहेत. अशातच पास आणि संख्येवर काही वारकऱ्यांनी आक्षेप घेत नियम झुगारण्याच्या प्रयत्न करत महाद्वार गाठण्याचा प्रयत्न केला. यावेळी वारकरी आणि पोलिसात काही वेळ धुमश्चक्री उडाल्याचे दिसून आले.

 

हे ही वाचा : 

छत्रपती संभाजीनगर : संत एकनाथ महाराजांची पालखी जुने दादेगाव गावकऱ्यांनी अडवली

पुण्यात वारीच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघात; 6 वारकरी गंभीर जखमी

Back to top button