पुण्यात वारीच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघात; 6 वारकरी गंभीर जखमी | पुढारी

पुण्यात वारीच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघात; 6 वारकरी गंभीर जखमी

पुणे : आषाढी वारीच्या पहिल्याच दिवशी एसटी बस आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला आहे . या भीषण अपघातात सहा वारकरी जखमी झाले आहेत. पुरंदर तालुक्यातील पुणे-पंढरपूर मार्गावर भोरवाडीफाटा येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत अधिक माहित अशी की, वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरहून पुण्याकडे निघालेली एसटी बस आणि पुण्याकडून वाल्हेकडे निघालेला कोंबड्यांची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात एसटीतील 6 जण प्रवाशी जखमी झाले असून यातील एका प्रवाशाच्या पायाला मार लागून पायाचे हाड मोडले आहे. एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून जखमींना जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये वारकऱ्यांचाही समावेश आहे. हे वारकरी आळंदीकडे पालखी प्रस्थान सोहळ्याला निघाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

हेही वाचा

कर्करोगावर रामबाण उपाय शोधल्याचा इस्रायलचा दावा

‘कौन बनेगा सभापती’ ! कर्जत बाजार समिती सभापतीची आज होणार निवड

सांगली : नरसिंहगावच्या हद्दीत जीप दुभाजकावर आदळून २ जण ठार

Back to top button