सासवड : श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल | पुढारी

सासवड : श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल

सासवड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी पायी वारी पालखी सोहळा बुधवार (दि. 14) व गुरुवार (दि. 15) या कालावधीत सासवड (ता पुरंदर) येथे दोन दिवस मुक्कामासाठी येणार असल्याने ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काळात पोलिस यंत्रणेने सुरक्षेवर अधिक भर दिला आहे. बुधवार व गुरुवार दिवेघाट पालखी सोहळ्याव्यतिरीक्त अन्य लोकांसाठी बंद राहील, असे सासवड पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.

पालखी सोहळा काळात वाहतुकीत बदल यात पुणे ते सासवड (सासवड मुक्काम) बुधवार (दि. 14) रात्री 2 वा. तसेच शुक्रवार (दि. 16) रात्री 12 पर्यंत पुणेकडून सासवडकडे दिवेघाट व बोपदेवघाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही वाहतूक खडीमशीन चौक, कात्रज, कापूरव्होळ मार्गे जाईल. सासवड बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी सर्व वाहतूक गराडे, खेड शिवापूरमार्गे पुण्याकडे येईल.

सासवड ते जेजुरी (जेजुरी मुक्कम), जेजुरी ते वाल्हे (वाल्हे मुक्काम) शुक्रवार (दि. 16) रात्री 2 ते शनिवार (दि.17) रोजी रात्री 12 पर्यंत पुणे येथून सासवड, जेजुरी, वाल्हे, निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणार्‍या वाहनांनी झेंडेवाडी, पारगाव मेमाणे- सुपे-मोरगाव-निरा या मार्गाचा वापर करावा. वाल्हे ते लोणंद (लोणंद मुक्कम) रविवार (दि. 18) रोजी पहाटे 2 पासून सायं. 5 पर्यंत या मार्गाचा वापर नागरिकांनी करायचा आहे.

पालखी काळात बंदोबस्तासाठी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक बारामती आनंद भाईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी, तानाजी बरडे, पोलिस उपविभागीय अधिकारी (5), पोलिस निरीक्षक (17), पोलिस अधिकारी (76), सहायक पोलिस निरीक्षक (59), पोलिस पुरुष (450), पोलिस महिला (150), वाहतूक पोलिस (60), होमगार्ड (600), वाहने (50) अशी यंत्रणा असून, दोन पाळ्यांत पोलिस बंदोबस्त काम पाहणार आहे. सातारा जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी व्यवस्थित पोहचवली जाणार आहे. यात पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक बारामती आनंद भाईटे हे या सोहळ्याचे नेतृत्व करणार आहेत, अशी माहिती सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली.

हेही वाचा

Ashadhi Wari 2023 : वारीची माहिती आता एका क्लिकवर; हे मोबाईल अ‍ॅप करा डाऊनलोड ?

धार्मिक, जातीय तेढ निर्माण केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास 5 वर्षांपर्यंत कारावास

पंजाबमध्ये 7 कोटींचा दरोडा

Back to top button