पंजाबमध्ये 7 कोटींचा दरोडा

पंजाबमध्ये 7 कोटींचा दरोडा
Published on
Updated on

लुधियाना, वृत्तसंस्था : सशस्त्रधारी दरोडेखोरांनी येथील न्यू राजगुरूनगर परिसरात एका वित्तीय संस्थेवर दरोडा टाकून 7 कोटी रुपयांचा डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली.

उत्तररात्री 1.30 च्या दरम्यान 10 दरोडेखोर कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीच्या कार्यालयात घुसले आणि साधारणपणे 7 कोटी रुपयांची रोकड घेऊन ते तेथून पसार झाले. नेमकी किती रक्कम चोरीस गेली, याची अद्याप मोजदाद सुरू असल्याचे कंपनीच्या वतीने यावेळी स्पष्ट करण्यात आले.

लुधियाना पोलीस आयुक्त मनदीपसिंग सिद्धू यांनी रात्री 1.30 च्या दरम्यान ही घटना घडली असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरोडेखोरांनी वापरलेली कॅश व्हॅन नंतर मुल्लनपूर दखा येथे आढळून आल्याचे ते म्हणाले. या कारमध्ये दोन शस्त्रे सापडल्याचा उल्लेख त्यांनी केला.

घटनास्थळी वित्तीय संस्थेत तैनात 5 पैकी 2 सुरक्षारक्षकांकडे शस्त्रास्त्रे होती. पण, दरोडा पडत असताना त्यांनीही प्रतिकार केला नाही, असे सिद्धू यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. या दरोड्याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news