पुण्यात प्रवेशद्वाराची कमान कोसळून बालकाचा मृत्यू | पुढारी

पुण्यात प्रवेशद्वाराची कमान कोसळून बालकाचा मृत्यू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नियोजित गृहप्रकल्पातील प्रवेशद्वाराची कमान कोसळून सात वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी ठेकेदारासह दोन कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्णव मिथिलेश राय (वय 7, सध्या रा. गुलमोहोर सोसायटी, वाघोली, नगर रस्ता) असे मृत बालकाचे नाव आहे. या प्रकरणी अर्णवचे वडील मिथिलेश राय (वय 36) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी ठेकेदार सिराज मुल्ला, कामगार दाजीज इबन खान, रामप्रवेश राधेशाम राय (रा. पोरवाल रस्ता, लोहगाव) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील नियोजित गुलमोहोर सोसायटीच्या आवारातील प्रवेशद्वार बांधकामाचे काम ठेकेदार सिराज मुल्ला याने घेतले आहे. प्रवेशद्वाराचे काम निकृष्ट केल्याने कमान कोसळली. कमानीचा काही भाग तेथे थांबलेला अर्णव राय याच्या अंगावर कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे तपास करीत आहेत.

हेही वाचा

पुणे : सुट्ट्यांमध्ये पीएमपी सुसाट; मासिक उत्पन्नात 2 कोटी, तर प्रवाशांमध्ये 9 लाखांनी वाढ

WTC Final 2023 : शिवधनुष्य पेलण्यासाठी निग्रहाने टिकण्याची गरज

U.S. – Saudi Relationship : सौदीची अमेरिकेला धमकी! तेल उत्पादनातील कपातीवरून उद्भवला वाद

Back to top button