U.S. – Saudi Relationship : सौदीची अमेरिकेला धमकी! तेल उत्पादनातील कपातीवरून उद्भवला वाद | पुढारी

U.S. - Saudi Relationship : सौदीची अमेरिकेला धमकी! तेल उत्पादनातील कपातीवरून उद्भवला वाद

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : सौदी अरेबियाने तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिका आणि सौदी अरेबिया वादात सौदीचे प्रिन्स क्राऊन मोहम्मद बिन सलमान यांनी अमेरिकेला थेट धमकी दिली होती, असे वृत्त अमेरिकेतल ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. यामागे अमेरिकेऐवजी चीनकडून शस्त्रास्त्रे खरेदी करणे हा प्रिन्स सलमान यांचा उद्देश होता, असेही या दैनिकाने वृत्तात स्पष्ट केले आहे. (U.S. – Saudi Relationship)

सौदीमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होते, या अमेरिकेच्या ठपक्यामुळे असेही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि मोहम्मद बिन सलमान यांच्यातील बोलणे कमीच होते. याउपर अमेरिका हा सौदीचा पूर्वांपार व एक मोठा तेल ग्राहक आहे. (U.S. – Saudi Relationship)

रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटले तसे जगभरात तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. सौदीनेही नेमके त्या काळात तेलाचे उत्पादन कमी केले. त्याचा सर्वाधिक फटका अमेरिका आणि युरोपला बसला. बायडेन यांनी सौदीबद्दल तेव्हा नाराजी व्यक्त केली होती. सौदीला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यावर मोहम्मद बिन सलमान यांनीही, जे करायचे ते करा, मी खेटायला तयार आहे, असे थेट प्रत्युत्तर दिले होते, असे ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या वृत्तात म्हटलेले आहे. (U.S. – Saudi Relationship)

अमेरिकेतील गुप्तचर विभागातून लीक झालेल्या कागदपत्रांनुसार, सौदी अरेबिया चीनशी संबंध वाढवत आहे. चीनकडून ड्रोन, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि टेहळणी यंत्रणा सौदीला खरेदी करायची आहे. चीनच्या हस्तक्षेपामुळेच इराण आणि सौदीतील संबंध पूर्ववत झाले आहेत.

अधिक वाचा :

Back to top button