पैठण : श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे नाथांच्या वाड्यातून प्रस्थान | पुढारी

पैठण : श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे नाथांच्या वाड्यातून प्रस्थान

पैठण : पुढारी वृत्तसेवा – पैठण येथील ४२५ वर्षांची परंपरा असलेल्या शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या पादुका पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. आषाढी वारीसाठी नाथांच्या वाड्यातून पालखीप्रमुख रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थान करण्यात आले.

यावेळी पादुकाचे पूजन नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, रेखाताई कुलकर्णी, रवींद्र कुलकर्णी, ज्ञानेश महाराज गोसावी पालखीवाले, योगेश महाराज गोसावी पालखीवाले, सचिन महाराज पांडव, रवींद्र महाराज पांडव यांनी केले. पादुका पूजन केल्यानंतर भानुदास एकनाथ जय घोषात नाथांच्या पवित्र पादुका पालखीमध्ये विराजमान करण्यात आले. पालखी पारंपरिक मार्गाने संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात विसावा घेण्यात आला.

पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या दर्शनासाठी नाथाच्या समाधी मंदिरातून पालखी प्रस्थान ओट्यावर ठेवून मग प्रस्थान करण्याची परंपरा आहे. सायंकाळी दर्शनासाठी हजारो भाविक या सोहळ्यानिमित्त एकत्र येऊन पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी हजारोच्या संख्येने सहभाग झालेल्या संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या वारकऱ्यांना शुभेच्छा पालखी देऊन पालखी प्रस्थान केली जाते.

दरम्यान संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थान पूर्वी नियोजन बैठकीत अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. पालखी प्रस्थान काळामध्ये महावितरण विभागाने विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रस्थान वेळेस नाथांच्या मंदिरासह शहरामध्ये विद्युत पुरवठा सकाळपासूनच खंडित झाल्याने पहिल्या दिवशी भजन कीर्तन करणाऱ्या वारकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

Back to top button