पिंपरी : पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल

पिंपरी : पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिघी-आळंदी, भोसरी, तळवडे, देहूरोड, निगडी, चिंचवड, पिंपरी वाहतूक विभागातील वाहतुकीत बदल केले आहेत. पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

दिघी-आळंदी वाहतूक विभाग
(हा बदल 12 जून रात्री नऊपर्यंत राहील)

बंद मार्ग – चिंबळी ते आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे. भोसरी चौक- मॅगझीन चौक
बंद मार्ग – चाकण ते आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे. भोसरी चौक- मॅगझीन चौक
बंद मार्ग – वडगाव घेनंद ते आळंदी
पर्यायी मार्ग – कोयाळी कमान, कोयाळी-मरकळगाव मार्गे
बंद मार्ग – मरकळ ते आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग – धानोरे फाटा-चर्‍होली फाटा-मॅगझीन चौक/ अलंकापूरम चौक मार्गे
बंद मार्ग – भारतमाता चौक ते आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे. भोसरी चौक- मॅगझीन चौक. मोशी-चाकण-शिक्रापूर मार्गे
बंद मार्ग – मोशी आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे. भोसरी चौक- मॅगझीन चौक. मोशी-चाकण-शिक्रापूर मार्गे
बंद मार्ग – विश्रांतवाडी ते आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग – भोसरी-मोशी-चाकण मार्गे. चर्‍होली फाटा ते कोयाळी, शेलपिंपळगाव मार्गे. अलंकापुरम-जय गणेश साम—ाज्य चौक मार्गे.
भोसरी वाहतूक विभाग
(हा बदल 12 जून रोजी रात्री नऊपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत राहील)
बंद मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक ते अलंकापुरम
पर्यायी मार्ग – नाशिकफाटा ओव्हरब्रिज मार्गे सांगवी बाजूकडून जाता येईल
बंद मार्ग – भोसरी ते मॅगझीन चौक
पर्यायी मार्ग – नाशिकफाटा ओव्हरब्रिज मार्गे सांगवी बाजूकडून जाता येईल
बंद मार्ग – भोसरी ते दिघी
पर्यायी मार्ग – नाशिकफाटा ओव्हरब्रिज मार्गे सांगवी बाजूकडून जाता येईल.

तळवडे वाहतूक विभाग
(बदल 11 जून रोजी सायंकाळी सहापर्यंत राहील)
बंद मार्ग – जुना पुणे-मुंबई महामार्ग देहूकमान ते देहूगाव
पर्यायी मार्ग – भक्ती-शक्ती चौक ते त्रिवेणीनगर ते तळवडे गावठाण ते कॅनबे चौक ते खंडेलवाल चौक मार्गे देहूगाव
बंद मार्ग – चाकण ते कॅनबे चौक
पर्यायी मार्ग – तळवडे गावठाण ते चिखली ते डायमंड चौक ते मोईगाव मार्गे निघोजे एमआयडीसी
बंद मार्ग – तळेगाव चाकण रोड देहूफाटा ते देहूगाव
पर्यायी मार्ग – एच पी चौक मार्गे
बंद मार्ग – देहूकमान ते चौदा टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद राहील

देहूरोड वाहतूक विभाग
(हा बदल 11 जून रोजी मध्यरात्री बारा ते सायंकाळी सहा पर्यंत राहील)
बंद मार्ग – जुना मुंबई पुणे महामार्गावरील सेन्ट्रल चौक देहूरोड ते भक्ती शक्ती मार्गे पुणे शहराकडे जाणारा मार्ग
पर्यायी मार्ग – सेन्ट्रल चौक ते मामुर्डी ते किवळे ते भूमकर चौक ते डांगे चौक मार्गे

पिंपरी वाहतूक विभाग
बंद मार्ग – महावीर चौक ते डी मार्ट सर्व्हिस रोड
पर्यायी मार्ग – डी मार्ट समोरील ग्रेड सेपरेटर मधून
बंद मार्ग – ऑटो क्लस्टर ते हनुमान मंदिर
पर्यायी मार्ग – मदर तेरेसा पुलावरून काळेवाडीमार्गे जाता येईल
बंद मार्ग – पिंपरी पूल ते सम—ाट चौक
पर्यायी मार्ग – महावीर चौक मार्गे
बंद मार्ग – पिंपरी चौक ते गांधीनगर
पर्यायी मार्ग – महावीर चौक मार्गे
बंद मार्ग – गांधीनगर ते आंबेडकर चौक
पर्यायी मार्ग – नेहरूनगर मार्गे
बंद मार्ग – वल्लभनगर ते पुणे सर्व्हिस रोड
पर्यायी मार्ग – ग्रेडसेपरेटरमधून

भोसरी वाहतूक विभाग
बंद मार्ग – फुगेवाडी चौक ते हॅरिस ब्रिज ग्रेड सेपरेटर
पर्यायी मार्ग – दापोडी ओव्हरब्रिजने सांगवी अथवा पुण्याकडे जाता येईल
बंद मार्ग – शितळादेवी चौक ते फुगेवाडी चौक
पर्यायी मार्ग – सांगवी व बोपोडी औंध रोड मार्गे
बंद मार्ग – दापोडी आंबेडकर चौक ते जुना पुणे मुंबई रोड
पर्यायी मार्ग – सांगवी व बोपोडी औंध रोडमार्गे
बंद मार्ग – भोसरी ते शिवाजीनगर पुणे
पर्यायी मार्ग – नाशिकफाटा ओव्हरब्रिज मार्गे सांगवी बाजूकडून जाता येईल
चिंचवड, पिंपरी, भोसरी वाहतूक विभागातील बदल 12 जून पहाटे दोन ते रात्री नऊपर्यंत राहील. मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार चालू-बंद केली जाईल.

(हा बदल 11 जून मध्यरात्री बारा ते 12 जून रात्री नऊ पर्यंत राहील)
बंद मार्ग – भक्ती-शक्ती चौकातून पुण्याकडे जाणारा मार्ग
पर्यायी मार्ग – काचघर चौकातून बिजलीनगर चौक मार्गे डांगे चौकातून पुण्याकडे
बंद मार्ग – खंडोबा माळ चौक ते टिळक चौक
पर्यायी मार्ग – थरमॅक्स चौक मार्गे. चिंचवड मार्गे./
बंद मार्ग – तळवडे ते त्रिवेणीनगर चौक
पर्यायी मार्ग – रुपीनगरकडून येणारी वाहतूक चिकन चौक मार्गे चाकणकडे जाईल
बंद मार्ग – दुर्गामाता चौक ते टिळक चौक
पर्यायी मार्ग – भोसरीकडून येणारी वाहतूक तळवडे रोडने चाकण मार्गाने मुंबईकडे जाईल
बंद मार्ग – काचघर चौक ते भक्ती-शक्ती
पर्यायी मार्ग – काचघर चौक येथून भेळ चौक मार्गे जाईल
बंद मार्ग – लोकमान्य हॉस्पिटल ते टिळक चौक
पर्यायी मार्ग – म्हाळसाकांत चौक मार्गे खंडोबामाळ चौकाकडे जाईल
बंद मार्ग – म्हाळसाकांत चौक ते खंडोबामाळ
पर्यायी मार्ग – आकुर्डी गावठाण येथून टिळक चौक मार्गे
बंद मार्ग – दीपज्योती अपार्टमेंट ते विठ्ठल मंदिर आकुर्डी
पर्यायी मार्ग – पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर दीपज्योती अपार्टमेंटकडून वाहतूक म्हाळसाकांत चौकाकडे जाईल
बंद मार्ग – विवेकनगर भाजीमंडई ते विठ्ठलमंदिर आकुर्डी
पर्यायी मार्ग – पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर विवेकनगर भाजी मंडई आकुर्डीकडून येणारी वाहतूक शिवम डेअरीला लागून असलेल्या रस्त्याने म्हाळसाकांत चौकाकडे जाईल
बंद मार्ग – हनुमान मंदिर ते विठ्ठलमंदिर आकुर्डी
पर्यायी मार्ग – पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर हनुमान मंदिर आकुर्डीकडून येणारी वाहतूक म्हाळसाकांत चौकाकडे जाईल
बंद मार्ग – सिद्धेश्वर क्लासिक अपार्टमेंट ते विठ्ठलमंदिर आकुर्डी
पर्यायी मार्ग – पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सिद्धेश्वर क्लासिक अपार्टमेंटकडून येणारी वाहतूक म्हाळसाकांत चौकाकडे जाईल

बंद मार्ग – काळभोरनगर ते भक्ती-शक्ती चौक सर्व्हिस रोड बंद
पर्यायी मार्ग – काळभोरनगरपासून भक्ती-शक्ती चौकाकडे जाणारी वाहने ग्रेड सेपरेटरमधून जातील
बंद मार्ग – बिजलीनगर ते भक्ती-शक्ती चौक
पर्यायी मार्ग – बिजलीनगर चौकाकडून भक्ती-शक्ती चौकाकडे न जाता रावेत मार्गे मुंबईकडे जाता येईल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news