विखे-शिंदे यांच्यातील गैरसमज दूर ; वाद संपला : महसूलमंत्री विखे पाटील यांचे स्पष्टीकरण | पुढारी

विखे-शिंदे यांच्यातील गैरसमज दूर ; वाद संपला : महसूलमंत्री विखे पाटील यांचे स्पष्टीकरण

नगर : पुढारी वृत्तसेवा : आमदार राम शिंदे व आमच्यातील समज-गैरसमज दूर झाले आहेत. त्यामुळे आमच्यात समन्वय सुरु आहे. माझ्या दृष्टिने तो विषय संपला असल्याचे स्पष्ट करत महसूल मंत्री विखे पाटील यांनी आ. शिंदे-विखे वादावर पडदा टाकला.
महसूल मंत्री विखे पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आषाढी वारी 2023 नियोजन आढावा बैठक आयोजित केली होती. आढावा बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मंत्री विखे पाटील म्हणाले, चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात माझी आ. शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. समज गैरसमज दूर झाले आहेत. समन्वय देखील चांगल्या पध्दतीने सुरु आहे. त्यामुळे आता विषय संपला असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत भाजपचे कोल्हे व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी एकत्र येत आवाहन दिल्याबाबत विचारले असता, विखे पाटील म्हणाले, सहकारी संस्थांमध्ये पक्षीय राजकारण नसते. त्यामुळे हे दोन्ही राजकीय पक्ष एकत्रित आले आहेत. मात्र, त्यांचे निवडणुकीतील एकत्रिकरण गांभीर्याने घेण्यासारखे नसल्याचे विखे पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

हे ही वाचा : 

Foreign Currency : देशाच्या विदेशी चलन साठ्यात 5.9 अब्ज डॉलर्सने वाढ

पुणे-पानशेत रस्ता खचला ! पावसाळ्यात तब्बल 60 गावांचा संपर्क तुटण्याची भीती

Back to top button