पुण्यात जपानच्या राजदूतांनी मारला वडापाववर ताव | पुढारी

पुण्यात जपानच्या राजदूतांनी मारला वडापाववर ताव

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील खाऊगल्लीतील खाद्यपदार्थांची ख्याती खूपच दूरवर पसरली असून, शुक्रवारी (दि. 9) पुण्यात आलेल्या जपानच्या राजदूतांनी खाऊ गल्लीत वडापाव खाण्याचा आनंद घेतला. ’वडापाव लय भारी…’ म्हणत थोडा तिखा कम करो, असे सांगत त्यांनी याचा आस्वाद घेतला. जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्या वेळी त्यांनी पुण्यातील खाऊ गल्लीत जाऊन आवर्जून वडापाव खाल्ला. त्यानंतर मिसळपाव खाण्याचा देखील आनंद घेतला. हे सर्व खाल्ल्यावर सुझुकी यांनी याचे व्हिडीओ आपल्या टि्वटर अकाउंटवर शेअर केले आहेत.

असा झाला सुझुकींचा दौरा…

हिरोशी सुझुकी जपानचे भारतातील राजदूत आहेत. ते पुण्यात एका कार्यक्रमासाठी सपत्नीक आले होते. त्यांनी कार्यक्रमानंतर पुण्यातील जपानी असोसिएशनच्या सदस्यांची भेट घेतली. तत्पूर्वी, त्यांनी पुण्यातील जापनीज भाषेचे सल्लागार कुरोडो यांची देखील भेट घेतली. त्यानंतर त्यांनी खाऊगल्लीत जाऊन वडापाव आणि अनलिमिटेड मिसळपाव खाण्याचा आनंद घेतला. या वेळी त्यांनी भारत आणि जपान मैत्रीचे प्रतीक असलेल्या ओकायामा मैत्री उद्यानाला म्हणजेच पु. ल. देशपांडे उद्यानाला सपत्नीक भेट दिली.

हेही वाचा

पुणे : विद्या बँकेच्या सेवकांच्या वेतनात 10 टक्के वाढ

औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याचे प्रकरण ; शेवगावात दोन युवकांना अटक

धुळ्यात आज हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा

Back to top button