वेल्हे : तोरणा, पानशेतला मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

वेल्हे : तोरणा, पानशेतला मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत, दासवे परिसरातील सह्याद्रीच्या डोंगररांगांसह वेल्हे भागात मान्सूनपूर्व पावसाने शुक्रवारी (दि. 9) हजेरी लावली. गुरुवारी दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. शुक्रवारी सकाळपासूनच जोरदार वारे वाहू लागले. दुपारी एकनंतर आकाशात ढग जमा होऊ लागले. ठरावीक अंतराने हलक्या सरी पडल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. वेल्हे बुद्रुक येथील शेतकरी विकास गायखे म्हणाले की, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस पडतो.

मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वरसगाव धरणखोर्‍यातील दासवे, धामण ओहोळ भागांत दुपारी दोनच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. वेल्हे तोरणा भागातही पाऊस पडला. सिंहगडाच्या पश्चिमेकडील खामगाव छत्र, निगडे मोसे परिसरात पावसाने हजेरी लावली. दासवे (ता. मुळशी) येथील शेतकरी किरण कोंडीबा मरगळे म्हणाले की, धुळवाफेवर डोंगरी पट्ट्यात बहुतेक शेतकर्‍यांनी भातरोपांची पेरणी केली आहे. पावसामुळे रोपांची उगवण होणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news