

पुणे; पुढारी वृत्तसेवा : काही घरगुती भांडणामुळे… काही कौटुंबिक समस्यांमुळे… तर चांगले जीवन आणि शहरातील ग्लॅमरच्या शोधात काही चिमुकले आपल्या कुटुंबीयांना न सांगताच रेल्वे स्थानकावर येतात. अशाच 33 मुलांची सुटका एकाच महिन्यात पुणे रेल्वे सुरक्षा बलाकडून करण्यात आली आहे. तर मध्य रेल्वेकडून एकाच महिन्यात 167 मुलांची सुटका करण्यात आली आहे.
मे-2023 या एकाच महिन्यात ही कामगिरी करत हरवलेल्या 163 मुलांना शोधून त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले आहे. 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते'अंतर्गत मुलांची सुटका करण्याची जबाबदारी आरपीएफने पार पाडली असून, सुटका करण्यात आलेल्या 163 मुलांमध्ये 133 मुले आणि 30 मुलींचा समावेश असून, चाइल्ड लाइनसारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने हे काम पूर्ण झाले.
हेही वाचा