गहाळ झालेले तब्बल १९ मोबाईल हस्तगत | पुढारी

गहाळ झालेले तब्बल १९ मोबाईल हस्तगत

ओतूर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा  :  ओतुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे वेगवेगळ्या ठिकाणावरून गहाळ झालेले मोबाईल हस्तगत करण्यात ओतूर पोलिसांना यश आले. यामध्ये सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीचे मोबाईल मिळून आले आहेत.  दिवसेंदिवस मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी वाढत होत्या. त्या पार्शवभूमीवर तब्बल १९ मोबाईलचा शोध ओतूर पोलिसांनी लावला आहे.

मिळून आलेल्या मोबाईलच्या मूळ मालकांचा शोध घेऊन ते बुधवारी (दि. ७) रात्री ८ वाजेच्या सुमारास अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे ,जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले. हरवलेला मोबाईल पुन्हा मिळणे ही खूप दुर्मिळ बाब आहे; मात्र ओतूर पोलीस त्यास अपवाद असल्याने ओतूरकर नागरिकांनी ओतूर पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.

ही कारवाई ओतुरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे, पोलिस हवालदार महेश पटारे, नरेंद्र गोराणे, बाळासाहेब तळपे, धनंजय पालवे, सायबर पोलिस ठाणे पुणे ग्रामीण येथील हवालदार महेश गायकवाड, सुनिल कोळी, चेतन पाटील तसेच पोलिस मित्र छोटू मणियार यांनी केली.

हे ही वाचा : 

https://pudhari.news/soneri/564595/adipurush-director-kiss-to-kriti-sanon-at-tirumala-temple-area-tirupati/ar

https://pudhari.news/maharashtra/pune/564572/revenue-minister-radhakrishna-vikhe-patil-inspected-palkhi-maidan-of-jejuri/ar

 

Back to top button