Kriti Sanon : तिरुपती मंदिरात दिग्दर्शकाने क्रिती सेनॉनला केलं किस, नेटकऱ्यांकडून टीका (Video) | पुढारी

Kriti Sanon : तिरुपती मंदिरात दिग्दर्शकाने क्रिती सेनॉनला केलं किस, नेटकऱ्यांकडून टीका (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी चित्रपट आदिपुरुषचे दिग्दर्शक ओम राऊत यांच्यावर नेटकऱ्यांकडून टीका होत आहे. (Kriti Sanon ) तिरुपती बालाजी मंदिरात त्यांनी क्रिती सेनॉनला किस केल्याने लोक ट्रोल करत आहेत. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आदिपुरुषचे दिग्दर्शक तिरुपती येथे क्रितीला किस करताना दिसत आहे. (Kriti Sanon )

एकाने ट्विट केलं होतं, की एका पवित्र स्थानावर असा प्रकार करण्याची गरज आहे? सार्वजनिकपणे प्रेम व्यक्त करणं, तिरुमालामध्ये मंदिरासमोर किस करणं आणि आलिंगन देणं अयोग्य आहे.

दरम्यान, आदिपुरुष १६ जून रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

“मंदिरात आल्यानंतर मला खूप आश्चर्य वाटते. छान वाटलं. आज सकाळी छान दर्शन घेतले. काल आम्ही ट्रेलर प्रदर्शित केला. ही एक मंत्रमुग्ध करणारी भावना आहे आणि मी ती शब्दात मांडू शकत नाही,” ओम राऊत त्यांच्या मंदिर भेटीबद्दल बोलताना म्हणाले.

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

Back to top button