महासागरात माशांची मरणयात्रा ! प्लास्टिक, पारा व वाढते प्रदूषण मुळावर

महासागरात माशांची मरणयात्रा ! प्लास्टिक, पारा व वाढते प्रदूषण मुळावर
Published on
Updated on
आशिष देशमुख
पुणे : अतिमासेमारीसह वाढता प्लास्टिकचा कचरा, महासागरात वाढणारे पार्‍याचे प्रमाण व तुलनेने प्रवाळ कमी होणे यासह विविध कारणांमुळे माशांवर संक्रात येत आहे.  सन 2048 पर्यंत महासागरात मासे शिल्लकच राहणार नाहीत, असा धक्कादायक निष्कर्ष जगातील समुद्री तज्ज्ञांनी काढला आहे.
तसेच महासागरांतील प्रवाळ नष्ट होत असल्याने मान्सूनचे चक्र बदलत असल्याचेही तज्ज्ञ सांगतात.  आठ जून हा जागतिक समुद्र दिवस म्हणून संयुक्त महासंघाच्या वतीने 2008 पासून साजरा केला जातो. आजही जगात 7 हजार 800 माशांच्या प्रजाती जिवंत आहेत. मात्र, आपण महासागरातील जिवांचे जीवन पूर्णपणे संपुष्टात आणण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहोत, याचे मुख्य कारण म्हणजे मानवी वापरासाठी अतिरिक्त मासेमारी आणि वाढते प्रदूषण, हवामानातील बदल हे होय.

वाढते प्रदूषण सागरी जीवांच्या मुळावर

अतिमासेमारी बरोबरच महासागरातील प्रदूषणामुळे सागरी जीवही नष्ट होत आहेत. प्लॅस्टिक प्रदूषण हा यातील एक मोठा भाग आहे, ज्यात सुमारे 100 दशलक्ष टन प्लास्टिक तरंगत आहे. या प्लास्टिकचे विघटन झाले नाही, तर मासे, व्हेल, कासव आणि पक्षी मारून परिसंस्थांमध्ये प्रवेश करते. 90 टक्के समुद्री पक्ष्यांमध्ये प्लास्टिकचे तुकडे आढळत असल्याची माहिती पुढे आली आहे.

माशांपेक्षा  प्लास्टिकच जास्त

2050 पर्यंत जगातील महासागरांमध्ये माशांपेक्षा जास्त प्लास्टिक असू शकते. 1950 मध्ये सीफूड प्रजाती चांगल्या स्थितीत होत्या; परंतु 1950 ते 2050 या 100 वर्षांमध्ये जागतिक सीफूड प्रजातींचा नाश होऊ शकतो आणि महासागरातील जीवनच संपुष्टात येण्याच्या स्थितीत येऊ शकते.

मस्यपालन फक्त 15 टक्के

जगातील केवळ 15 टक्के मत्स्यपालन तुलनेने चांगल्या स्थितीत होत आहे. उर्वरित 85 टक्के मत्स्यपालन  कमी झाले आहे. ही परिस्थिती भविष्यात सुधारण्याची चिन्हे नाहीत. एक मासा 2 दशलक्ष डॉलर्समध्ये, तर  2013 मध्ये ब्लूफिन ट्यूना जपानमध्ये 1.76 दशलक्षला विकला गेला.
जगातील महासागरात जसे प्लास्टिक कचर्‍याचे प्रमाण वाढत आहे तसा पारा वाढत आहे. पारा माशांच्या पोटात जात आहे. प्लास्टिक व पारा मासेच नव्हे, तर समुद्री जीवन नष्ट करू पाहत आहे. तसेच महासागरातील प्रवाळ नष्ट होत आहेत, त्यामुळे  मान्सूनवरही त्याचा परिणाम होत आहे.
– प्रियांका गायकवाड,  समुद्री अभ्यासक, केरळ
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news