

पळसदेव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्या संपून नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होत आहे. त्यामुळे विविध माध्यमांच्या शाळा सोमवार (दि.15) पासून सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच पालक व शिक्षकांची शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी गडबड दिसून येत आहे. शैक्षणिक साहित्याच्या दरामध्ये सरासरी 20 टक्क्यांनी वाढ आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला मात्र चाट बसत आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या संकटामुळे शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले होते.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळत असली, तरी खासगी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके विकत घ्यावी लागत आहेत. त्याबरोबरच शालेय गणवेश, शूज, वह्या आदी घेण्यासाठी शालेय साहित्याच्या दुकानात गर्दी होत आहे. वाढत्या दराचा फटका पालकांना बसला आहे.
लहान मुलांच्या स्कूल बॅग, वॉटर बॅग, गणवेश आदींच्या दारातही वाढ झाली आहे. मोठ्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चापेक्षा लहान मुलांच्या शिक्षणाचा खर्च जास्त आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहेत, असे समजते. तसेच सर्व शाळांना एकच गणवेश राज्य शासनाने जाहीर केला आहे. तोही एकाच दिवशी वाटप होणार आहे.
शंभर पानी साधी वही : 25 ते 30 रुपये प्रतिनग
दोनशे पाणी साधी वही : 35 ते 40 रुपये प्रतिनग
क्वायर बुक 100 पानी : 40 ते 45 रुपये
क्वायर बुक 200 पानी : 80 ते 85 रुपये
साधे पेन : 5 रुपयांवरून आता 7 रुपये
हेही वाचा