पुणे : कार्ल्यात एमटीडीसीचे 38 एकरांवर चाणक्य केंद्र | पुढारी

पुणे : कार्ल्यात एमटीडीसीचे 38 एकरांवर चाणक्य केंद्र

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्ला येथे 38 एकर क्षेत्रावर चाणक्य एक्सलन्स सेंटर खासगी भागीदारीतून उभारणार आहे. सुमारे 80 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, मान्यतेसाठी उच्चाधिकार समितीसमोर सादर करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा, कार्ला ही मोठी पर्यटन केंद्रे असून, या ठिकाणी किल्ले, नद्या, दर्‍या, धबधबे, निर्मळ तलाव, धरणे आणि लेण्यांपासून विविध आकर्षण आहेत. देश-विदेशातील पर्यटक येथे भेटी देतात.

या दोन्ही ठिकाणी पर्यटकांना आवश्यक सुविधांची कमतरता आहे. एमटीडीसीमार्फत कार्ला येथे पर्यटन निवास चालविले जाते. आता त्याचे चाणक्य एक्सलन्स सेंटरमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कार्ला हे जागतिक पातळीवर ओळखले जाते. येथे देश-विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. कार्ला हे मुंबईपासून 90, तर पुण्यापासून 60 किमी अंतरावर आहे. ओद्योगिक वसाहती असून, हा परिसर व्यावसायिक हब आहे.

चाणक्य केंद्रासाठी 80 कोटींचा खर्च

चाणक्य केंद्र उभारण्यासाठी सुमारे 80 कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. त्यामध्ये शासनाकडून सुमारे 63 कोटी येणे अपेक्षित आहे, तर खासगी सहभागातून टेंट सिटी व वेलनेस हब उभारण्यासाठी सुमारे 17 कोटी रुपयांची गुंतवणूक ही खासगी व्यक्तीमार्फत केली जाणार आहे.

हेही वाचा

नगर : कापडबाजार, चितळे रोड मिरवणुकांसाठी बंद

पुणे जिल्ह्यातील 60 तलावांतील गाळ काढण्याचे काम सुरू

नगर : ओढ्या-नाल्यांवरील बांधकामे हटवा ; स्थायी समितीच्या आढावा बैठकीत मागणी

Back to top button