कोरेगाव पार्क : स्थानिक नागरिकांकडून नोटिशीनुसार कारवाई थांबविण्याचे प्रयत्न | पुढारी

कोरेगाव पार्क : स्थानिक नागरिकांकडून नोटिशीनुसार कारवाई थांबविण्याचे प्रयत्न

कोरेगाव पार्क(पुणे); पुढारी वृत्तसेवा : ताडीवाला भागातील झोपडपट्टीतील रहिवाशांना रेल्वे प्रशासनाकडून जागा खाली करण्याबाबत नोटिसा पाठविण्यात आल्याने झोपडीधारकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांकडून विविध प्रशासकीय यंत्रणांकडे विनंती अर्ज करून कारवाई थांबविण्याबाबत प्रयत्न केले जात आहेत. यात रेल्वेचे डीआरएम कार्यालय, पुणे महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त यांच्यासह राजकीय नेत्यांशा चर्चा करण्यात येत आहे.

विविध राजकीय पक्ष एकत्र येऊन कारवाई थांबविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नुकतेच रयत सेवा झोपडी संस्था संलग्न मातोश्री रमाबाई आंबेडकर कृती समितीच्या वतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. या प्रश्नाबाबत केंद्रीय स्तरावर चर्चा करणार असल्याचे पवार यांनी शिष्टमंडळांना सांगून रेल्वे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते जगताप, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, लता राजगुरू, रजनी त्रिभुवन, मयूर गायकवाड, राहुल तायडे, सुजित यादव, प्रमोद गायकवाड, किशोर वाघेला, सोनू काळे आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे बसपाकडून विभागीय आयुक्त सौरभ राव यांना ताडीवाला भागातील झोपडपट्टीधारकांवरील कारवाई थांबविण्यासाठी निवेदन देण्यात आले.

विभागीय आयुक्तांनी कारवाई होऊ देणार नाही. रेल्वे आणि शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले. निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश बसपा प्रभारी डॉ हुलगेश चलवादी, महासचिव सुदीप गायकवाड, सचिव भाऊसाहेब शिंदे, पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड, महंमद शफी, बाबा ओहोळ, रमाकांत खंडे, सागर खंडे, मुकेश गायकवाड, सनी गाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

आमदार अपात्रप्रकरणी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन : राहुल नार्वेकर

कात्रज : आरोग्य विभागाची ‘साफसफाई’

नगर : राहुरीत ब्युटीपार्लरला आग, साहित्य खाक

Back to top button