आमदार अपात्रप्रकरणी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन : राहुल नार्वेकर | पुढारी

आमदार अपात्रप्रकरणी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन : राहुल नार्वेकर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत आपण लवकरच क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले आहे. माजी मंत्री दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्यावरील ‘दौलत’ या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त केलेल्या भाषणात ते बोलत होते.

राज्यातील सत्ता संघर्षाबाबत निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या राजकीय डावपेचावर टीका करत, सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यावर सोपवली आहे; पण हा निर्णय देताना न्यायालयाने निश्चित कालावधी स्पष्ट केला नाही. त्यामुळे नार्वेकर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष होते.

हेही वाचा : 

Back to top button