पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व गरजूंसाठी प्राथमिक शिक्षण प्रवेश प्रक्रिया शासनामार्फत राबविली जाते. मात्र, यामध्ये उत्पन्नाचा दाखल दाखवून मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक होत आहे. शासनाने पॅन कार्डचा पुरावा घेऊन प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे शहराध्यक्ष सागर आल्हाट यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.
याबाबत आल्हाट म्हणाले, या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याच्या पालकांकडून लाखो रुपये उकळून बोगस अॅडमिशन झाल्याची शक्यता अधिक आहे. आरटीई प्रक्रियेत श्रीमंतांना न्याय आणि गरिबांना अन्याय सहन करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या वतीने पुण्यातील व इतर परिसरातील सर्व शाळा यांना सक्त आदेश देऊन सर्वांना पॅन कार्ड सक्तीने तपासून मगच आरटीईअंतर्गत प्रवेश मंजूर करावेत. याबाबतची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सक्तवसुली संचालनालय यांच्याकडेही करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
हेही वाचा