पुण्यातील आधार केंद्र बंद असल्याने नागरिकांचे हाल | पुढारी

पुण्यातील आधार केंद्र बंद असल्याने नागरिकांचे हाल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आधार नोंदणी किंवा अद्ययावतीकरण करताना वेळोवेळी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (UID) आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणार्‍या जिल्ह्यातील महाआयटीच्या 96 आधार यंत्रचालकांचा निलंबित करण्यात आहे. तर, सुरू असलेल्या आधार केंद्रांत मर्यादित आधार कार्ड दुरुस्ती करीत आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

शाळा, महाविद्यायये, रुग्णालये, बँक यांसह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधितांचा आधार क्रमांक घेण्यात येतो. नाव, छायाचित्र, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख आदी तपशील अद्ययावत करावे लागतात. मात्र, आधार यंत्रचालकांकडून यूआयडीएआयच्या सूचनांचे पालन केले जात नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 96 आधार यंत्रचालकांचा परवाना रद्द करण्यात आला असून, त्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

नागरिकांना मारावे लागतात हेलपाटे

जिल्ह्यात सध्या सहाशेपेक्षा अधिक आधार केंद्र सुुरू असल्याचे यूआयडीच्या संकेतस्थळावर दिसते. मात्र, प्रत्यक्षात अनेक केंद्रचालक हे दिवसभरात 5 ते 10 आधार कार्ड दुरुस्ती करीत आहेत. त्यामुळे टोकन घेण्यासाठी सकाळी लवकर केंद्रावर जावे लागत आहे. टोकन मिळाले तरी अनेकवेळा सर्व्हर संथ होत असल्याने टोकन मिळाला तरी आधारमधील दुरुस्ती होईल की नाही, याची शाश्वती नसते. त्यामुळे नागरिकांना आधार केंद्राचे हेलपाटे मारावे लागत आहेत.

700 आधार यंत्रचालक कार्यरत आहेत. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची आधारची कामे केली जात आहेत. नागरिकांना आपल्या जवळच्या आधार केंद्रांची माहिती मिळविण्यासाठी यूआयडीएआयच्या संकेतस्थळावर जाऊन मलोकेट द एन—ोलमेंट सेंटरफ या पर्यायावर जाऊन तालुका, गाव किंवा पिनकोडनिहाय शोध घेता
येऊ शकतो.

– डॉ. वनश्री लाभशेटवार, उपजिल्हाधिकारी

हेही वाचा

पुणे : ‘आयटी’ कंपनीला पायघड्या? मंत्र्यांच्या दबावामुळे पालिका अधिकार्‍यांच्या ‘जोर-बैठका’

World Oceans Day : सागरी प्रदूषण जलचरांकरिताच नव्हे मानवासाठीही घातक

Kolhapur violence : वरणगे पाडळीत प्रार्थनास्थळाची तोडफोड, जाळपोळ; तणाव

Back to top button