‘माझी वसुंधरा’ने पुणे जिल्हा सन्मानित; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना गौरविले | पुढारी

‘माझी वसुंधरा’ने पुणे जिल्हा सन्मानित; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना गौरविले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘माझी वसुंधरा’ अभियान 3.0 अंतर्गत उच्चतम कामगिरीबद्दल पुणे महसूल विभाग राज्यात पहिल्या क्रमांकाचा विभाग ठरला आहे. त्याशिवाय विविध गटांतून एकूण 8 पुरस्कार पुणे जिल्ह्याला प्राप्त झाले. याबद्दल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात अमृत गट (राज्यस्तर) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेला पहिला क्रमांकाचा आणि पुणे महापालिकेला तिसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला.

नगर परिषद व नगर पंचायत गट अंतर्गत लोणावळा नगर परिषदेला दुसर्‍या क्रमांकाचा आणि बारामती नगर परिषदेला तिसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. याच गटात विभागस्तर पुरस्कार अंतर्गत पुणे विभागात तळेगाव दाभाडे नगर परिषदेला जाहीर झाला. माळेगाव बु.(ता. बारामती) नगर पंचायतीला राज्यस्तरावरील दुसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या जिल्ह्यासाठीचा पहिल्या क्रमांकाचा राज्य पुरस्कार पुणे जिल्हाधिकारी यांना जाहीर झाला आहे.

महापालिकेचा तिसरा क्रमांक

‘माझी वसुंधरा’ अभियान 3.0 अंतर्गत पुणे महापालिकेस तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्वीकारला. अध्यक्ष राहुल नार्वेकर, राधाकृष्ण विखे पाटील, शंभूराज देसाई, डॉ. कुणाल खेमणार, माधव जगताप,मंगेश दिघे, पूजा ढोले उपस्थित होते.

हेही वाचा

जगातील सर्वात गरीब देश बुरूंडी

कोल्हापूर : सीपीआर अपघात विभागाची इमारतच धोकादायक!

Back to top button