देहूगाव : श्री संत तुकाराम महाराज पालखी रथास झळाळी | पुढारी

देहूगाव : श्री संत तुकाराम महाराज पालखी रथास झळाळी

देहूगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : संत तुकाराम महाराज आषाढी पायी वारी सोहळा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थानच्या वतीने संत तुकाराम महाराजांची चांदीची पालखी आणि रथास झळाळी देण्यात आली आहे.
घनश्याम गोल्डचे कुशल वर्मा आणि त्यांचे कारागीर कमर महमद हुसेन आत्तार, इस्माईल युसुब आत्तार, महमद हूसेन युसुब आत्तार, शहाजान जब्बार आत्तार आणि उमर महमद हुसेन आत्तार यांनी पालखी आणि रथास झळाळी देण्याचे काम केले.

याला दिली जाणार झळाळी

संत तुकाराम महाराजाची पालखी, चांदीचा रथ, चांदीची पालखी, संत तुकोबांचा मुखवटा, पादुका, गरुड टक्के, अब्दागिरी, राजदंड, सिंहासन, मोठे ताट, जरीचे फेटे दोन, नैवद्याचे ताट 1, फूलपात्र 2, चमच्या 1, पंचाआरती, वात, शेंगदाणे आणि साखरेचे असे 3 डब्बे, देवाची छत्री आणि देवाच्या पूजेचा पितळी डब्बा आणि पितळी समई आदी वस्तुंना झळाळी देण्याचे काम केले जाणार आहे.
झळाळी देण्यासाठी याचा केला वापर चिंचेचे पाणी, लिंबू, रिटा, वॉशिंग पावडर, ब—श आणि इतर केमिकल्सचा वापर करून झळाळी देण्यात आली.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक

तुकोबांच्या पालखी रथास आणि पालखीस गेल्या सात वर्षांपासून घनश्याम गोल्ड झळाळी देण्याचे काम सेवाभावी वृत्तीने करीत आहेत. मोठ्या श्रध्दापूर्वक हे मुस्लिम कारागीर झळाळी देण्याचे काम करत आहेत. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन हे काम करीत असल्याचे समाधान तर मिळतेच पण तेवढाच आनंदही मिळत असल्याचे कारागिरांनी सांगितले. संत तुकोबारायांचा हा पालखी सोहळा म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक्षेत असल्याची भावना मुस्लिम कारागिरांनी व्यक्त केली.

हेही वाचा

अकरावीसाठी 14 जूनपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया

पिंपरी : पोहण्यासाठी मोजा वीस रूपये; पालिका जलतरण तलावांच्या तिकीट, पासदरात दुप्पटीने वाढ

जयप्रभा स्टुडिओ प्रकरणी सरकारने अहवाल मागवला

Back to top button