लग्नाच्या आमिषाने बलात्कार; पुण्यात एकाच दिवशी चार घटना | पुढारी

लग्नाच्या आमिषाने बलात्कार; पुण्यात एकाच दिवशी चार घटना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात बलात्काराचे चार गुन्हे दाखल झाले आहेत. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी तसेच धमकी देऊन बलात्कार केल्याबाबत शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिलेला लग्नाचे आमिष दाखवून, तसेच तिला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करणार्‍या एकावर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मेहुल मनोजकुमार (रा. वीर सावरकरनगर, जळगाव) व त्याच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 36 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पुढील तपास गुन्हे निरीक्षक भुजबळ करत आहेत.

पाच जणांवर गुन्हा

तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार, अनैसर्गिक कृत्य करून तिच्याकडून एक लाख रुपये घेतले, तर घरच्यांनी मुलाबरोबर लग्न करायचे असेल तर पाच लाख द्यावे लागतील, अशी मागणी केली. तिने घडलेला प्रकार त्याच्या आईवडिलांना सांगितला असता, त्याच्या आईवडिलांनी मुलाचा साखरपुडा केला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणीला आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि मुलाचा नाद सोडण्याची धमकी दिली. याप्रकरणी शुभम पायगुडे, रोहित पायगुडे, अनिल पायगुडे, संगीता पायगुडे, बाळासाहेब पायगुडे (सर्व रा. आगळंबे, हवेली) यांच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 23 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै 2019 ते आजतागायत घडला.

गुंगीचे औषध देऊन अत्याचार

दोन मुले असताना तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शीतपेयातून गुंगीचे औषध टाकून तिच्यावर बलात्कार करणार्‍या व त्याचे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती गरोदर असताना आरोपीने तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले, मात्र नंतर तो लग्न न करता पळून गेला. याप्रकरणी चेतन प्रफुल्ल गणात्रा (38, रा. खामगाव, बुलढाणा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 22 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.

स्नॅपचॅटवर शरीरसुखाची मागणी

अल्पवयीन मुलीला स्नॅपचॅटवर मेसेज करून शरीरसुखाची मागणी करणार्‍या एकावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय रणसिंग (28) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 15 वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2 जून रोजी घडला.

खोटे आश्वासन देणार्‍यावर गुन्हा

महिलेला व तिच्या दोन मुलांना सांभाळण्याचे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार करणार्‍या व गर्भवती राहित्यानंतर तिचा गर्भपात करून दुसर्‍याच मुलीशी लग्न करणार्‍या एकावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक सुरेश धुमाळ (30, रा. मुरूड, लातूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 38 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

Sensex Opening Bell: आठवड्याची दमदार सुरुवात, सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला

नो पार्किंगचा बोर्ड असेल तरच गुन्हा!

पुणे : कोंडीत अडकली रुग्णवाहिका; सारसबाग चौकात सिग्नल बंद

Back to top button