‘आप’ची स्वराज्य यात्रा घडवणार बदल, पिंपरी शहरात आज आगमन | पुढारी

‘आप’ची स्वराज्य यात्रा घडवणार बदल, पिंपरी शहरात आज आगमन

पिंपरी (पुणे) : पुढारी वृत्तसेवा: ‘आम आदमी पक्षाची 28 मे ते 6 जून या कालावधीत पंढरपूर ते रायगड अशी स्वराज्य यात्रा निघाली आहे. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत पिंपरी-चिंचवड शहरात या स्वराज्य यात्रेचे 3 व 4 जूनला आगमन होणार आहे. यानिमित्ताने शहर कार्यकारिणीच्या वतीने पिंपरी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी परिषदेत शहर प्रवक्ते राज चाकणे, शहर उपाध्यक्ष संतोष इंगळे, दत्तात्रय काळजे, सीता केंद्रे, स्वप्निल जेवळे उपस्थित होते. परिषदेत माहिती देताना शहर चाकणे म्हणाले की, आपचे राष्ट्रीय संघटन सचिव संदीप पाठक आणि महाराष्ट्र राज्य सह-प्रभारी गोपाल इटालिया याच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वराज्य यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यात गावोगावी जाऊन जनतेच्या समस्यांना वाचा फोडणे. तसेच दिल्ली आणि पंजाबसारखे महाराष्ट्रातील जनतेने आप पार्टीला मतदान केल्यावर हा पक्ष राज्यात काय बद्दल करू शकतो, याविषयी जनजागृती करण्यासाठी पक्षाची कार्यकारिणी काम करत आहे.

यात्रेच्या निमित्ताने ‘आप’ने महाराष्ट्रात संघटन विस्ताराची मोहीम हाती घेतली आहे. यात्रेचे शहरात आगमन झाल्यावर पदयात्रा व जनसभा रॅली अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने शहरातील प्रश्नांची चर्चा जनतेसमोर करण्यात येणार आहे. पालिकेतील टक्केवारीचे राजकारण आणि प्रशासकांची मनमानी, महापालिकेची मालमत्ता आणि नाट्यगृह, दवाखाने यासारख्या सेवांचे खासगीकरण आदीसह सर्व प्रश्नांना स्वराज्य यात्रेत वाचा फोडणार असल्याचे चाकणे यांनी सांगितले. स्वराज्य यात्रेचे शहरात शनिवार (दि. 3) आगमन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

कचरा वेचून मुलासोबत केला अभ्यास, मायलेकांनी दहावीत मिळवलं घवघवीत यश

लोणावळा : राजमाचीच्या जंगलात लुकलुकणार्‍या काजव्यांची चांदण्यांशी स्पर्धा

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या मिळकतकरात पडणार 45 कोटींची भर

 

Back to top button