शेखर गायकवाड यांनी साखर आयुक्तालयाचा चेहरा-मोहरा बदलला, अनुप कुमार यांचे गौरवोद्वगार | पुढारी

शेखर गायकवाड यांनी साखर आयुक्तालयाचा चेहरा-मोहरा बदलला, अनुप कुमार यांचे गौरवोद्वगार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आयुक्तालयाच्या कामकाजाचा चेहरा-मोहरा बदलून ऊसाची एफआरपीची रक्कम वेळेवर देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेत शेतकरीभिमुख कामकाज केले. त्यामुळे मंत्रालय स्तरापर्यंत ऊस आणि साखरेबाबतच्या कोणत्याच अडचणी जाणार नाहीत, याची दक्षता घेत त्यांनी चांगली कारकीर्द केल्याचे गौरवौद्गार राज्याचे सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी येथे काढले.

साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि साखर संचालक (प्रशासन) उत्तम इंदलकर हे बुधवारी (दि.31) सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने साखर संकुल येथे सायंकाळी आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी गायकवाड व इंदलकर यांचा सपत्निक सत्कार अनुप कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून सहकार आयुक्त अनिल कवडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

या वेळी साखर उद्योगातील सुधारणा व लिगल फ्रेमवर्क ऑफ शुगरइंडस्ट्री या दोन पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनोगतात शेखर गायकवाड यांनी साखर आयुक्तालयातील कारकिर्दीत घेतलेले नवीन निर्णय, केलेली अंमलबजावणी, शेतकर्‍यांना देऊ शकलेल्या ऊसाच्या एफआरपीबद्दल समाधान व्यक्त केले. उत्तम इंदलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

अतिरिक्त पदभार अनिल कवडे यांच्याकडे

साखर आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे देण्यात आला असून, सायंकाळी त्यांनी तो स्वीकारला आहे. तर साखर संचालक (प्रशासन) पदाचा अतिरिक्त पदभार साखर सहसंचालक (उपपदार्थ) संतोष पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.

हेही वाचा:

फळे, फुले, मसाला लागवडीसाठी अनुदान, संचालक डॉ. के. पी. मोते यांचे शेतकर्‍यांना अर्ज करण्याचे आवाहन

नगर: तीन वर्षांनंतरही ‘आयुष’ अपूर्णच..! बांधकाम झालं; निधीअभावी फर्निचर, विद्युतीकरण अडले

धनगर समाजाला दरवर्षी 25 हजार घरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

 

Back to top button