पुणे : साई ट्रेडिंग कंपनीला भीषण आग; जीवितहानी नाही | पुढारी

पुणे : साई ट्रेडिंग कंपनीला भीषण आग; जीवितहानी नाही

पुणे : पुढारी ऑनलाईन आज (बुधवार) सकाळी ०४.१७ वाजण्याच्या सुमारास पुणे-नगर रोड वाघोली, उबाळे नगर, कावडे वस्ती येथील साई ट्रेडिंग कंपनीला भीषण आग लागली. कंपनीमध्ये अमूल कंपनीचे बटर, चीज, मिल्क, आईस्क्रीम, ताक, लस्सी, इतर शीतपेय, होती. PMRDA वाघोली अग्निशमन केंद्र येथील दोन अग्निशमन वाहनांच्या मदतीने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

तात्काळ मदद मिळाल्यामुळे बाजूला असलेल्या गोडाऊनला व बाहेर असलेल्या दोन पिकअप वाहनांना सुरक्षित करण्यात आले. आगीच्या ठिकाणी गोडाऊन मध्ये असलेले एक महिंद्रा पिकअप डी फ्रिजर असलेले वाहन या आगीमध्ये जळाले. सुदैवाने या दुर्घटणेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

PMRDA अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन जवान अग्निशमन केंद्र अधिकारी विजय महाजन, वाहन चालक अल्ताब पटेल, ज्ञानेश्वर राठोड, नितीन माने फायरमन- सुरज इंगवले, प्रशांत चव्हाण, संदीप तांबे, प्रकाश मदने, सचिन गवळी, विकास पालवे, महेश पाटील, रिजवान फरास यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

हेही वाचा : 

Back to top button