Devendra Fadnavis : राज्यात ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये महापालिकांच्या निवडणुका: देवेंद्र फडणवीसांचे संकेत | पुढारी

Devendra Fadnavis : राज्यात ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये महापालिकांच्या निवडणुका: देवेंद्र फडणवीसांचे संकेत

पुणे: पुढारी वृत्तसेवा : राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे, असे सुतोवाच करून पुणे महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकेल, यात शंका नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (दि.१५) येथे व्यक्त केला. एका कार्यक्रमात ते बोलत होते.

फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असताना त्यावेळी मोठा संघर्ष उभा राहिला, त्यावेळी पुणे शहर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. कोरोनासोबत संघर्ष होताच, त्याबरोबर महावसुली सरकारसोबतही संघर्ष होता, यातून भ्रष्टाचारी सरकारविरोधात भाजपने काम केले.

मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण होणार आहे. हे नऊ वर्ष हे भारताच्या विकासाचे वर्ष आहे. पंतप्रधान मोदी यांनी जगात आपली प्रतिमा तयार केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा निर्माण केला. पाकिस्तान आणि श्रीलंका यासासह जगातील अनेक देशात आर्थिक मंदी आहे, परंतु भारतात मंदी आली नाही. गेल्या नऊ वर्षात बदललेला भारत पाहायला मिळत आहे.

 

Devendra Fadnavis : राज्यात जनतेने २०१९ मध्ये युतीला कौल दिला

राज्यात जनतेने २०१९ मध्ये युतीला कौल दिला. परंतु त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी अभद्र युती केली. त्यानंतर अडीच वर्षे आम्ही संघर्ष केला. त्यावेळी अशा सरकारला घालवणे आवश्यक होते, ते आम्ही घालवला त्याचा अभिमान आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा गतीने विकास होत आहे, असेही ते म्हणाले.

कर्नाटकमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. भाजपचे मतदान कमी झालेले नाही. परंतु जनता दलाचे मतदान कमी झाले, त्याचा फायदा काँग्रेसला झाला, परंतु राज्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उड्या मारत आहेत. परंतु पुन्हा एकदा केंद्रात आणि राज्यात आपलेच सरकार येणार आहे, त्यासाठी मोदी सरकारने केलेली काम लोकांमध्ये जाऊन सांगा, असे आवाहन फडणवीस यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button