सावत्र दिराच्या हल्ल्यात वहिनीचा मृत्यू; भाऊ जखमी; पळून जाताना धडक लागून दिराचाही मृत्यू

सावत्र दिराच्या हल्ल्यात वहिनीचा मृत्यू; भाऊ जखमी; पळून जाताना धडक लागून दिराचाही मृत्यू

शिरुर (पुणे), पुढारी वृत्तसेवा : आंबळे (ता. शिरुर) येथे शेती करायला लावण्याच्या कारणावरुन सावत्र भावाने दुसरा भाऊ व वहिनीवर डंबेल्सने हल्‍ला केला. या हल्ल्यात वहिनीचा मृत्यू झाला. तसेच हल्ल्यानंतर पळून जाताना चारचाकी वाहनाला धडकून दिराचाही मृत्यू झाला. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. २४) मध्यरात्री घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, प्रियंका सुनील बेंद्रे (वय २८) हिचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती सुनील बाळासाहेब बेंद्रे (वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील हल्लेखोर भाऊ अनिल बाळासाहेब बेंद्रे याचादेखील अपघातात मृत्यू झाला. याबाबत बाळासाहेब पोपट बेंद्रे (वय ५९, रा. आंबळे, ता. शिरूर) यांनी तक्रार दिली आहे.

मृत प्रियंका आणि पती सुनील हे नोकरीनिमित्त विदेशात जाणार असल्याने गावी आले होते. अनिल याला गावाकडे नेऊन गायी घेऊन देऊ, शेती करायला लावू, असे सांगून सुनिलने १५ एप्रिल रोजी अनिल यास गावाकडे आणले. बाळासाहेब बेंद्रे हे आंबळे येथे राहतात. त्यांना पहिल्या पत्नीचा सुनील तर दुस-या पत्नीचा अनिल ही दोन मुले आहेत. सुनील हा आय.टी. इंजिनीअर असल्याने तो पुण्यातील आय.टी. कंपनीत नोकरीला होता. पत्नी प्रियंकाही आय.टी. कंपनीत नोकरी करत होती. अनिल हा पदवीधर असल्याने तो देखील पुण्यात खाजगी कंपनीत काम करत होता.

मात्र शेती करायची मानसिकता अनिल याची नसल्याने त्याने त्याचा राग धरत रविवारी (दि. २३) घराच्या वरच्या खोलीत कोंडुन घेवून घरातील सर्व वस्तुंची तोडफोड केली.  त्यानंतर त्याला कुटुंबियांनी समजावून सांगितले. सोमवारी (दि. २४) रात्री जेवण झाल्यानंतर पहाटे साडे चार वाजता बाळासाहेब यांना ओरडण्याचा मोठा आवाज आला. त्यांनी गच्चीवर धाव घेतली तर त्या ठिकाणी अनिल याने आपला सावत्र भाऊ सुनील व वहिनी यांच्यावर चाकु, व्यायामाच्या डंबेल्स व विटांनी मारले होते. आरडाओरड झाल्याने बाजुचे चुलते आल्याने अनिल याने पळ काढला. तो दुचाकीने (एमएच १२ एमयु ४२८६) पळून जात असताना न्हावरा-चौफुला रस्त्यावर कार गाडीला (एमएच १२ ई इक्स ६६९५) तो जावून धडकला. या दुर्घटनेत अनिलचा मृत्‍यु झाला.

या हल्यात जखमी झाल्याने सुनील यास पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

.हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news