राजाराम कारखाना निवडणूक : संस्था गटातून महादेवराव महाडिक यांचा विजय | पुढारी

राजाराम कारखाना निवडणूक : संस्था गटातून महादेवराव महाडिक यांचा विजय

कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक विजयी झाले आहेत. त्यांनी विरोधी सतेज पाटील गटाचे सचिन पाटील यांचा ३९ मतांनी पराभव केला.

कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी कार्यक्षेत्रातील ५८ केंद्रांवर १३ हजार ५३८ पैकी १२ हजार ३३६ (९१.१२ टक्के) मतदान झाले होते. आज मतमोजणी होत असून या निवडणुकीत आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोल्हापूर, सांगलीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

संस्था गटातून सत्ताधारी गटाचे नेते, माजी आमदार महादेवराव महाडिक विजयी झाले आहेत. संस्था गटात १२९ पैकी १२८ मतदारांनी मतदान केले होते. त्यातील महाडिक यांना ८३ इतकी मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन पाटील (वसगडे, ता करवीर) यांना ४४ मते मिळाली आहेत. १२८ मतांपैकी १२७ मते वैध ठरली. दरम्यान, पहिल्या फेरीअखेर व्यक्ती उत्पादक सभासदांच्या गटात महाडिक गट आघाडीवर आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरीत विरोधी सतेज पाटील गट मताधिक्य कमी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button