शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलग्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी | पुढारी

शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलग्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी

लखीमपूर; पुढारी वृत्तसेवा

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात, गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा आरोपी मुलगा आशिष मिश्राला 3 दिवसांच्या पोलीस कोठडीवर पाठवण्यात आले आहे. एसपीओ एसपी यादव यांनी सांगितले की, 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत आरोपी आशिषला पोलीस रिमांडवर पाठवले जात आहे.

सीजीएम चिंताराम यांनी अटींसह पोलिस कोठडी रिमांड दिली. आरोपी आपल्या वकिलाला आपल्याकडे ठेवू शकतो. येण्या जाण्यासाठी मेडिकल केले जाईल, तर सुरक्षा व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल.

सोमवारी फिर्यादींकडून आशिषची पोलीस कोठडी मागितली होती, परंतु बचाव पक्षाच्या वकिलांनी त्यास आक्षेप घेतला. सरकारी वकील एसपी यादव यांनी सांगितले की, न्यायालयाने युक्तिवाद ऐकल्यानंतर आदेश राखून ठेवला होता आणि सुमारे एक तासानंतर आदेश पारित केला.

त्याच्याकडे बरेच व्हिडिओ देखील होते परंतु 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 ते 3.45 दरम्यान तो कुठे होता याबद्दल कोणताही ठोस पुरावा सादर करू शकला नाही. एवढेच नव्हे तर थारमध्ये त्याच्या कारपर्यंत काडतुसे कशी पोहोचली, याचेही उत्तर त्याच्याकडे नव्हते.

अनेक प्रत्यक्षदर्शी गोळीबाराबद्दल बोलले, त्याला आणि त्याचा मित्र अंकित दास यांच्या भूमिकेबद्दल विचारले असता, ते त्या प्रश्नाचे उत्तर टाळत राहिले. एसआयटीच्या अनेक प्रश्नांची त्यांची उत्तरे समाधानकारक नव्हती, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

आशिष मिश्रा यांना यूपीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मागच्या दारातून घेऊन गेले. ज्यामुळे त्याला मीडियाची गर्दी टाळण्यास मदत झाली. आशिष मिश्राची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली.

हे ही वाचलं का?

Back to top button