पुणे: गिरीश बापट यांनी व्हीलचेअरवरून बजावला मतदानाचा अधिकार

पुणे: गिरीश बापट यांनी व्हीलचेअरवरून बजावला मतदानाचा अधिकार
Published on: 
Updated on: 

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज (दि.२६) सायंकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी खासदार गिरीश बापट यांनी व्हीलचेअरवरून मतदान केंद्रावर हजेरी लावत आपला मतदानाचा हक्क बजावला.

खासदार गिरीश बापट गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत. आज व्हीलचेअरवर बसून बापट आपल्या कार्यकर्त्यांसह अहिल्यादेवी शाळेतील मतदान केंद्रावर हजर झाले. त्यांना पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी झाली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता.

व्हीलचेअरवर बसून सोबतीला ऑक्सिजन सिलेंडर घेऊन खासदार बापट यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर आणले. अशा कठीण परिस्थितीत देखील बापट यांनी राष्ट्रीय कर्तव्य असलेला मतदानाचा हक्क बजावला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news