पुणे : राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघामधील पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होत आहे. दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये अगदी संथगतीने मतदान चालल्याचे निदर्शनात आलं आहे. दुपारी तीन पर्यंत कसबा पेठ विधानसभा मतदार संघात जवळपास ३०.५ टक्के मतदान झाले आहे. तर चिंचवड मतदारसंघात ३०.५५ टक्के मतदान झाले आहे.
कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे हेमंत रासने यांच्यात, तर चिंचवड मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, बंडखोर अपक्ष राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होत आहे.