चिंचवड पोटनिवडणूक: दुपारनंतर मतदानासाठी नागरिकांची गर्दी | पुढारी

चिंचवड पोटनिवडणूक: दुपारनंतर मतदानासाठी नागरिकांची गर्दी

वाकड: पुढारी वृत्तसेवा : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज (दि. मतदान होत आहे. दुपारपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांची तुरळक गर्दी दिसत होती. परंतु सायंकाळच्या वेळेला वाकडमध्ये मतदानासाठी नागरिकांनी गर्दी केली. इन्फंट जीजस स्कूलमध्ये मतदानासाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.

दुपारपर्यंत नागरिकांची गर्दी कमी दिसून येत होती. मतदान केंद्राच्या बाहेर बसलेले पोलिंग एजंट दुपारच्या वेळेला निवांत बसून होते. मतदान केंद्रावर दुपारी शुकशुकाट होता. परंतु जशी जशी मतदानाची वेळ संपवायला येत होती. तसतशी नागरिक मतदान करण्यासाठी बाहेर पडत असल्याचे चित्र दिसून आले.

दरम्यान, रांगेमध्ये उभे असलेले मतदार आणि बंदोबस्तासाठी असलेले पोलिस यांच्यामध्ये रांगेत उभे राहण्यावरून वाद उद्भवत होते. जागा कमी असल्यामुळे २ रांगा करावे लागत होते.

हेही वाचा 

Back to top button