पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी वंचितची भूमिका स्पष्ट | पुढारी

पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी वंचितची भूमिका स्पष्ट

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मुंबईत काल शिवसेना आणि वंचित बहुजन विकास आघाडी च्या नेत्यांमध्ये बैठक झाली. यावेळी वंचितने स्पष्ट भूमिका घेतली की,पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार नसल्यानं वंचित कुणाला पाठिंबा देणार याबाबत स्वतंत्र भूमिका घेणार आहे.

दोन्हीकडे महाविकास आघाडी चे उमेदवार असल्याने त्यांना वंचितच्या पाठिंब्याबाबत गांभीर्य नसल्यानं त्याबाबत स्वतंत्र विचार करण्यात आल्याचं वंचितचे प्रवक्ते सिध्दार्थ मोकळे यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेसोबत युती असल्याने त्याच्या सोबत चर्चा करण्याची गरज होती त्यानुसार ही बैठक झाल्याचं मोकळे यांनी सांगितले.

Back to top button